आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील अवैध सावकारी:व्यक्तीकडून एक लाखाच्या बदल्यात 6 लाख केले वसूल; संशयित आरोपीला अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारीचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात समाेर आला आहे. एका सावकाराला पोलिसांनी दणका दिला आहे. एक लाखांच्या बदल्यात 6 लाख रुपये वसूल केल्यानंतर आणखी अडीच लाखाच्या मागणी करून धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार गुन्हा दाखल करून नागराज उर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (वय 24, शनी नगर जांभूळवाडी रोड,पुणे) या सावकाराला अटक केली आहे. दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

काय आहे प्रकरण?

सदरील मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आरोपीकडून 15 टक्के व्याजदराने 1 लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी ऑनलाईन आणि फोन पे द्वारे 5 लाख 95 हजार रुपये दिले होते. तरीही तक्रारदारास दंड आणि व्याजापाेटी आणखी अडीच लाखांची मागणी केली जात होती. त्यांच्या घरात घुसून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीस उधार पैशाचे व्याज दिले नाही म्हणून सतत आराेपी शिवीगाळ तसेच धमकी देऊन बळजबरीने ऑनलाईन पैसे पाठविण्यास लावत हाेता. पोलिसांनी याप्रकरणी चाैकशी करुन आराेपीला अटक करुन त्याच्या विराेधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39,45 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपाेलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पाेकळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा01) गजानन टाेंपे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सपाेनि अभिजीत पाटील, पाेउनि विकास जाधव, पोलिस अंमलदार प्रमाेद साेनवणे, रविंद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, हेमा ढेबे, नितीन कांबळे, दुर्याेधन गुरव, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण व संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली आहे.

ठार मारण्याची धमकी

खंडणी विराेधी पथक एक यांच्याकडे एका रिक्षाचालकाने एक सावकार अवाजवी व्याजाची पैशाची मागणी करुन धमकावत असल्याची तक्रार दाखल केली. तसेच सदर तक्रारदार यास घरी माणसे पाठवून सावकराकडून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली जात हाेती. याप्रकरणाची पाेलसांनी चाैकशी केली असता, तक्रारदार यांनी वेळाेवेळी 29 हजार 500 रुपये 15 टक्के व्याज दराने घेतले हाेते. त्याबदल्यात त्यांनी 54 हजार रुपयांंची परतफेड केली. परंतु त्यानंतरही सावकार दंड आणि व्याजापाेटी आणखी एक लाख 20 हजार रुपयांची मागणी करत हाेता. पैसे दिले नाही म्हणून तक्रारदार व त्याच्या पत्नीस सावकाराने डांबून ठेवत बळजबरीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास लावून शिवीगाळ करत जीवे मारण्याी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी बिलाल इसाक शेख (रा.बिबवेवाडी,पुणे) या आराेपीस अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...