आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पुनर्वसनाची मागणी:शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बचावासाठी पोहरादेवीचे 6 महंत पुण्यात

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्यावरील आरोपांबाबत पोलिस अहवालच्या मागणासाठी पोहरादेवीचे 6 महंत पुणे पोलिस आयुक्तांची शनिवारी दुपारी एक वाजता कार्यालयात भेट घेणार आहेत.

राजकीय कारकीर्द धोक्यात

शिष्टमंडळाचे अभय राठोड म्हणाले की, शिवसेना माजी मंत्री आमदार संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेतृत्व करत असून मोठ्या मताधिक्क्याने ते निवडणुकीत विजय झालेले आहेत. त्यांच्यावर आत्तापर्यंत केवळ आरोप झाले आहेत. मात्र, पोलिसांच्या चौकशीत कोणतीही बाब निष्पन्न झाल्याचे दिसून आली नाही. संबंधित आरोपामुळे त्यांचे राजकीय कारकीर्द धोक्यात आले असून, त्यांना महत्त्वाच्या पदापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन आम्ही सदर केसच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेणार आहे. त्याच सोबत संजय राठोड यांना सन्मानाने पुन्हा महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात यावी, अशा प्रकारची आमची सरकारकडे मागणी आहे. यासंदर्भात पूजा चव्हाण आत्महत्येशी महाआघाडी सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडला जात आहे. यामध्ये पहिला तक्रार अर्ज पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांना दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 7 फेब्रुवारी 2021 रोजी पूजा चव्हाणने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणात मंत्री संजय राठोड व मृत पूजा चव्हाणच्या नावाच्या संभाषणाच्या 12 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपनुसार मंत्री राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश एका युवकाला (अरुण राठोडला) दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ऑडिओ क्लीपवरून राठोड यांचे पूजाशी संबंध होते. सतच्या मानसिक त्रासाला कंटाळून प्रेमभंग किंवा त्याच्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. याचसोबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही राठोड याच्यावर ठोस कारवाई होण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला असून, राठोड यांना याप्रकरणात पोलिस अटक न करता पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत आहे.

बातम्या आणखी आहेत...