आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या १३ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर बलात्कार झाल्याचे माहिती असून तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली. दरम्यान या सर्व आरोपींना १६ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले. पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेतील आठ आरोपींना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. मंगळवारी केलेली कारवाई धरून एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे.
मिराअली उर्फ मिरा अजीज शेख, शाहजूर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद, समीर मेहबूब शेख, फिरोज उर्फ शाहरुख साहेबलाल शेख, महबूब उर्फ गौर सत्तार शेख आणि पीडितेचा मित्र मोहम्मद उर्फ गोलू मोज्जाम आलम(१९रा.वैशाली, बिहार) अशी या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अटकेतील आरोपींना विशेष न्यायाधीश एस.पी. पोंक्षे यांनी १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
मित्राला भेटण्यासाठी बिहारला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या १४ वर्षीय मुलीला प्रवासासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर सलग दोन दिवस शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली होती. पोलिसांनी मिसिंग प्रकरणाच्या तपासातून ही घटना उघडकीस आणत तत्परतेने आठ जणांना अटक केली होती. मंगळवारी नव्याने सहा जणांना अटक करण्यात आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली असून बारकाईने तपास केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.