आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पावसाचे परिणाम:वादळी पावसामुळे सहा हजार कोंबड्या दगावल्या, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यात दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथे शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील तब्बल ६ हजार कोंबड्या दगावल्या. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने याची दखल घेतली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील ऋषिकेश शिवाजी वर्पे यांच्या वातानुकूलित पोल्ट्री फार्ममधील तब्बल ६ हजार कोंबड्या दगावल्या. अचानक आलेल्या पावसामुळे वर्पे यांना काहीही करता आले नाही. जोरदार वारा आणि पावसाचा मारा सहन न झाल्याने सर्व कोंबड्या दगावल्या.

बातम्या आणखी आहेत...