आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथीयांचे दहा अर्ज:पुण्यामध्ये 720 पोलिस शिपाई पदांसाठी 66 हजार 142 अर्ज, पुणे शहर पोलिस दलासाठी शिपाई पदाची भरती सुरू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहर पोलिस दलासाठी होणारी शिपाई पदाची भरती प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पोलिस शिपाई पदासाठी तब्बल ६६ हजार १४२ अर्ज आले असून चालकपदासाठी ६ हजार ८४३ अर्ज आले आहेत. इतर जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्यात होत आहे. पुण्यात होणारी जी-२० परिषद, नुकताच झालेला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम, पोलिस क्रीडा स्पर्धा, २६ जानेवारी पोलिस परेड यासह विविध कार्यक्रमांमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा सध्या ताण आहे.

पुणे शहर पोलिस दलातील ७२० शिपाई पदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण ६६ हजार १४२ अर्ज आले आहेत, तर चालक पदासाठी ६ हजार ८४३ जणांनी अर्ज केले आहेत. चालक पदाची भरती वेगळी होईल, असेही सांगण्यात आले.

लेखी परीक्षा एकाच वेळी :
अनेक उमेदवारांनी दोन ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज केले आहेत. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो. मात्र, मुंबई वगळता बहुतांश जिल्ह्यांतील पोलिस भरतीची लेखीपरीक्षा एकाच दिवशी होण्याचा अंदाज आहे.

पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी तृतीयपंथीय उमेदवारांचे दहा अर्ज आले आहेत. मात्र, या वर्षीपासून तृतीयपंथीयांसाठी काही जागा राखीव ठेवल्या आहेत. यामुळे तृतीयपंथीना सर्व प्रक्रिया पूर्ण करून भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात आले. ७२० शिपाई पदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण ६६ हजार १४२ अर्ज आले आहेत. सदर भरती प्रक्रियेला सोमवारी सुरुवात करण्यात आली असल्याचे पुणे शहर उपायुक्त रोहिदास पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.

ग्रामीण पोलिसांची सहा जानेवारीपासून भरती
महाराष्ट्रातील बहुतांश घटकात पोलिस भरती प्रक्रिया चालू असुन, मैदानी चाचण्या सोमवार (२ जानेवारी) पासून सुरू करण्याचे आदेश झाले आहेत. पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकामध्ये दिनांक ३१/१२/२०२२ ते दिनांक ०२/०१/२०२३ रोजी दरम्यान कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. सदर बंदोबस्तानंतर पोलिस भरतीची तयारी करावयाची असल्याने पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकाच्या आस्थापनेवरील पोलिस भरती दिनांक ६/०१/२०२३ रोजीपासून पोलिस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकामध्ये ऑनलाइन अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या भरतीसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...