आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान वाद:पुण्यातील 664 अफगाणी विद्यार्थ्यांना लागली आई-वडिलांची काळजी; पुण्यात चार हजार 460 अफगाणिस्तानी दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर अनागोंदी निर्माण झाली असून अनेक जण देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, शिक्षणाच्या निमित्ताने भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सुरक्षेची आस लागली आहे. यंदाच्या वर्षी अफगाणिस्तानातून शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात ७०४ जण वेगवेगळ्या व्हिसांवर दाखल झाले असून त्यापैकी ६६४ विद्यार्थ्यांना पुन्हा देशात परतण्याविषयी अडचणी निर्माण झाल्याने तसेच पालक असुरक्षित वातावरणात अडकल्याने भवितव्य अधांतरी झाल्याचे दिसून येते आहे.

अफगाणिस्तानमध्ये शिक्षणाच्या संधी मर्यादित असल्याने उच्च शिक्षणाकरिता अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या देशांत दरवर्षी जात असतात. भारतात प्रामुख्याने ते शिक्षणाकरिता पुणे, मुंबई, बंगळुरू आदी शहरांत दाखल होतात. पुण्यात पुणे विद्यापीठ, सिम्बोयोसिस, भारती विद्यापीठ, व्हीआयटी कॉलेजमध्ये अफगाणिस्तानातील विद्यार्थी बीए, बीकॉम, बीबीए, बीसीएस आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असतात. मात्र, भारतात आल्यानंतर विद्यार्थ्यांना भाषेची अडचण असल्याने ते शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतच इंग्रजीचे ज्ञान प्राप्त करतात. मागील वर्षीपासून कोविडचे संकट सुरू झाल्याने अफगाणिस्तान दूतावासातून विद्यार्थ्यांना व्हिसा देणे बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संख्या रोडवलेली आहे.

त्यामुळे मर्यादितच स्वरूपात विद्यार्थी यंदाच्या वर्षीही अफगाणिस्तानातून बाहेर पडले. अफगाण विद्यार्थ्यांना आपल्या देशात परत जाणे धोक्याचे बनल्याने तसेच भारतातील व्हिसाची मुदत संपुष्टात येत असल्याने ते चिंतित झाले आहेत. पूना कॉलेज मध्ये बीबीएचे शिक्षण घेत असलेला काबूलचा बशरमल विद्यार्थी म्हणाला, मागील दोन वर्षांपासून मी पुण्यात राहत असून माझे कुटुंबीय अफगाणिस्तानात काबूलमध्ये आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये यंदा हिंसाचार न करता सत्तांतर केले परंतु नागरिक भयभीत झाले असून पालकांच्या सुरक्षेची मला चिंता लागली आहे. काबूलमध्ये पुन्हा परतणे धोकादायक असून अफगाणिस्तानातील स्थिती पूर्वपदावर येणे महत्त्वपूर्ण आहे.

पुण्यात चार हजार ४६० अफगाणिस्तानी दाखल
पुणे पोलिसांच्या परकीय नोंदणी विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड म्हणाले, मागील तीन वर्षांच्या कालावधीत पुणे शहरात चार हजार ४६० अफगाणिस्तानी आलेले आहेत. २०१९ मध्ये दोन हजार १५४ अफगाणिस्तानील लोक पुण्यात दाखल झाले त्यातील दोन हजार ९४ जण स्टुडंट्स व्हिसावर आले. २०२० मध्ये एक हजार ६०२ अफगाणिस्तानातील लोक आले त्यापैकी एक हजार ५१४ विद्यार्थी होते. यंदाच्या वर्षी ७०४ जण आले असून ६६४ विद्यार्थी आहेत. टुरिस्ट व्हिसावर १५, वैद्यकीय व एंट्री व्हिसावर प्रत्येकी आठ व्यक्ती आले असून एक जण बिझनेस व्हिसावर आलेला आहे.बातम्या आणखी आहेत...