आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धानोरीत 7 किलो अफीम बोंड्याचा चुरा जप्त:1 संशयित अटकेत, अमली पदार्थ विरोधी पथक 2 ची कारवाई

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफीम बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्याला एकाला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 82 हजारांचा 7 किलो दोडाचुरा जप्त करण्यात आला.

करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय - 38 रा. धानोरी, पुणे मुळगाव मुं. दुरासनी, तालुका, सोजत, जि. पाली, राज्य राजस्थान )असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोन धानोरी परिसरात पेट्रोंलिग करीत होते. त्यावेळी एकजण अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) अंमली पदार्थ विक्री करीता येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून करणसिंहला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, रोकडे, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, आझीम शेख, जगदाळे, योगेश मांढरे, दीशा खेवलकर, बास्टेवाड यांनी केली.

बंडगार्डन ठाण्याच्या हद्दीतील 2 हॉटेलला दणका

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून गाणी वाजविणाऱ्या दोन हॉटेल चालकांविरूद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. त्यांच्याकडील 1 लाख 70 हजारांची साउंड सिस्टीम जप्त करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. वन 8 कम्युन बार आणि मिलर्स लक्झरी क्लब अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेलची नावे आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बंडगार्डन परीसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी राजा बहादुर सिटी सेंटरजवळ मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत होता. त्यापार्श्वभूमीवर पथकाने खात्री केली असता वन 8 कम्युन बार आणि मिलर्स लक्झरी क्लब बारमध्ये साउंड सुरू असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरूद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार, गुन्हा दाखल करून 1 लाख 70 हजारांची साउंड सिस्टीम जप्त केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, एपीआय अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण व संदीप कोळगे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...