आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना:पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा लोखंडी स्लॅब कोसळून 7 कामगारांचा मृत्यू; बहुतांश कामगार बिहारमधील

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. येथील एका मॉलच्या बांधकामादरम्यान लोखंडी स्लॅब पडून 7 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत. इतर काहीजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

येरवडा परिसरातील शास्त्री वाडिया बंगल्याजवळ हा अपघात झाला. येथे एक मॉल बांधला जात होता. त्याच्या तळघरातील लोखंडी स्लॅब कोसळला. पुण्याचे डीसीपी रोहिदास पवार म्हणाले की, बांधकाम करताना जी खबरदारी घ्यायला हवी होती ती घेतली गेली नसावी.

रात्री उशिरापर्यंत कामगार काम करत होते
या इमारतीत रात्री उशिरापर्यंत काम सुरू असताना अचानक लोखंडी स्लॅब कोसळल्याचे वाहतूक पोलिस आयुक्त राहुल श्रीराम यांनी सांगितले. अपघात झाला तेव्हा तेथे 10 मजूर काम करत होते. मृत्युमुखी पडलेले बहुतांश मजूर हे बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...