आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात चांगली बातमी:प्राणघातक 'हायपर-इंफ्लेमेटरी सिंड्रोम'ला मात देऊन घरी परतला 7 वर्षीय चिमुकला

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाचे आई-वडील आणि भाऊ कोरोना संक्रमित होते, रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे लवकर ठीक झाले

कोरोना काळात एक सुखद बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका सात वर्षीय चिमुकल्याने प्राणघातक 'हायपर-इन्फ्लेमेंटरी सिंड्रोम' या आजारावर मात केली आहे. हा आजार कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये सर्वात जीवघेणा असतो. सात वर्षीय मुलाने अवघ्या 11 दिवसात या आजाराला मात दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासह त्याच्या मुलांना आणि पत्नीला तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसात मुलाचे आई-वडील आणि भावाने कोरोनावर मात केली, पण मुलात याचे भयंकर लक्षण दिसू लागले. डॉक्टरांनी अॅडवान्स टेस्ट केल्यानंतर मुलाला 'हायपर-इंफ्लेमेटरी सिंड्रोम' असल्याची माहिती समोर आली.

काय आहे 'हायपर-इंफ्लेमेटरी सिंड्रोम'?

मुलावर उपचार करणाऱ्या डॉ. भक्ती सारंगी यांनी सांगितले की, या आजारात शरीराच्या महत्वाच्या अंगासह संपूर्ण शरीरावर सूज येते. मुलाला दोन दिवसांपासून उलटी, पोटदुखी आणि ताप आली होती. त्यानंतर 10 ऑगस्टला त्लाया आयसीयूत भरती करण्यात आले. यादरम्यान मुलाचे पल्स रेट हाय तर ब्लडप्रेशर कमी झाले होते.

औषधानंतर फक्त 12 तासात कमी झाली ताप

सारंगी यांनी पुढे सांगितले की, तीन दिवस उपचार करुनही त्याची तब्येत ठीक होत नव्हती. त्यानंतर औषधे बदलून दिली आणि अवघ्या 12 तासात त्याची ताप कमी झाली आणि पोटदुखीदेखील राहिली. नंतर 11 दिवस चाललेल्या उपचारानंतर त्याला हॉस्पीटमधून सुट्टी देण्यात आली.