आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:साेलार पाॅवर प्लँटचे 74 लाख 39 हजार बुडवले

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात शिवाजी गाव येथील एका व्यावसायिकाकडून दाेन मेगावॅटचा ग्राउंड माउंटेड पाॅवर प्लँट बनवून घेण्यासाठी ठरल्याप्रमाणे वर्क आॅर्डरचे ७४ लाख ३९ हजार रुपये न देता एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मधुकर श्रीरंग काशीद (६६, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी दत्तवाडी पाेलिस ठाण्यात दाेन आराेपींविराेधात फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र यशवंत मेंहदळे आणि अच्युत मेहेंदळे (रा. पर्वती, पुणे) या आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सदरची घटना १३ एप्रिल २०२२ ते २२ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान घडलेली आहे. तक्रारदार मधुकर काशीद यांच्याकडून आराेपी यांनी दाेन मेगावॅटचा ग्राउंड माउंटेड साेलार पाॅवर प्लँट कर्नाटक येथे बनवण्याची वर्क आॅर्डर दिली. ठरल्या व्यवहाराप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे काम तीन महिन्यांत पूर्ण करून त्या कामाची रक्कम ७४ लाख ३९ हजार रुपये आराेपींकडे मागितले. परंतु आराेपींनी त्यांना बँकेची बनावट गॅरंटी देऊन त्यांची फसवणूक केली.

बातम्या आणखी आहेत...