आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात ३१ डिसेंबर २०१७ राेजी शनिवारवाडा येथे आयाेजित करण्यात आलेल्या एल्गार परिषद आणि दुसऱ्या दिवशी काेरेगाव भीमा येथे घडलेली हिंसाचाराची घटना याबाबतचा तत्कालीन पुणे शहराच्या पाेलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची साक्ष शुक्रवारी काेरेगाव भीमा चाैकशी आयाेगासमाेर नाेंदवण्यात आली. शुक्ला यांनी त्यांचे ७४ पानी प्रतिज्ञापत्र आयाेगासमाेर सादर केले असून त्याअनुषंगाने एका साक्षीदाराचे वकील बी. जी. बनसाेडे यांनी शुक्ला यांची उलटतपासणी घेतली.
एल्गार परिषदेच्या अनुषंगाने राज्यात सुरू असलेल्या घडामाेडींबाबत गुप्तचर विभागाकडून पुणे पाेलिसांना मिळालेले वेगवेगळे पत्र, साेशल मीडियात प्रसारित हाेणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजची पत्रे, बामसेफने चिथवाणीबाबत दिलेले पत्र, एल्गार परिषद आयाेजनास पुणे पाेलिस व पुणे महानगरपालिकेने दिलेल्या सशर्त परवानगीचे पत्र, बंदाेबस्त माहिती, फिर्यादी तुषार दामगुडे यांनी विश्रामबाग पाेलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार व एनआयकडे वर्ग झालेल्या तपासाची पत्रे व पिंपरी पाेलिस ठाण्यात अनिता सावळे यांनी दाखल केलेली तक्रार व पुणे ग्रामीण पाेलिसांकडे वर्ग केलेल्या तपासाची पत्रे रश्मी शुक्ला यांनी आयाेगासमाेर सादर केली आहेत. पुणे शहरात याेग्य बंदाेबस्त तैनात करण्यात आल्याने एल्गार परिषदेनंतर काेणताही अनुचित प्रकार किंवा हिंसाचार घडला नसल्याचे त्यांनी आयाेगासमाेर सांगितले. अक्षय बिक्कड याने सुरुवातीला डेक्कन पाेलिस ठाण्यात जिग्नेश मेवानी व उमर खलिद यांच्याविराेधात तक्रार दिली हाेती. सदर तक्रार विश्रामबाग पाेलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी काेणताही संपर्क ना साधता विचारणा केली नसल्याची त्यांनी आयाेगासमाेर साक्ष दिली. एल्गार आयाेजकांकडून शनिवारवाडा ते काेरेगाव भीमादरम्यान प्रेरणा मार्च काढण्यात येणार हाेता, परंतु त्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आयाेग काेरेगाव भीमा, वढूला भेट देणार : चाैकशी आयाेगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सदस्य सुमीत मल्लिक शनिवारी सकाळी अकरा वाजता काेरेगाव भीमा येथील जयस्तंभ आणि वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळास भेट देणार आहे. सदर भागातील काही महत्त्वपूर्ण ठिकाणी आयाेग भेट देऊन प्रत्यक्ष भाैगाेलिक परिस्थितीची पाहणी करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.