आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:शिक्षिकेला लग्नाच्या जाळ्यात अडकवून 8 लाखांची फसवणूक

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी जोडीदार शोधत असणाऱ्या शिक्षिकेला एकाने विदेशातून भारतात आल्याची बतावणी करून डॉलर करन्सी बदलण्यासाठी खात्यावर तब्बल ८ लाख १० हजार भरण्यास सांगून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सुशील कुमार दुबे (रा. पश्चिम दिल्ली) आणि विजया रिखेश्वर चेतीया (रा. आसाम) या दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ३९ वर्षीय शिक्षिका महिलेनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेच्या पतीचे नुकतेच निधन झाल्याने तिच्या घरच्यांकडून दुसरा जोडीदार शोधण्यासाठी सांगितले जात होते. त्याच दृष्टीने फिर्यादी ह्या विवाह संकेतस्थळावर जाऊन जोडीदाराचा शोध घेत होत्या. शादी डॉट कॉम या वेबसाइटवर त्यांची गॉडविन नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. त्याने आपण लंडन येथे राहत असल्याची बतवाणी केली. त्याने तिला ८ फेब्रुवारीला आपण लंडन येथून दिल्ली एअरपोर्टला आल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे डॉलर्स हे विदेशी चलन असून ते चलन भारतीय चलनात बदलून घेण्यासाठी खात्यावर ८ लाख १० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. आरोपीने केलेल्या मागणीनुसार विश्वास ठेवून फिर्यादीनेही त्यांना पैसे पाठवले होते.

बातम्या आणखी आहेत...