आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन मोटारसायकल चोरांना गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल हस्तगत केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.संदिप पोपट केदार(वय 21 वर्षे, रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर )व राजु गंगाराम दुधवडे,( वय 20 वर्षे, रा. चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे.
पुणे ग्रामीण जिल्हयातील मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने सदरची बाब गांभीर्याने घेवून पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्ट्या लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, पोना संदिप वारे, पोकों अक्षय नवले, चापोकों दगडु विरकर या पथकाने गोपनीय माहितीचे आधारे आरोपींना आपेघाट परीसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपींनी पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हातील मोटार सायकलचे एकुण चार गुन्हे उघडकिस आले असुन अडीच लाख रूपये किंमतीच्या एकूण 8 मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेकडून मागील महिनाभरात मोटार सायकल चोरीबाबत करण्यात आलेली ही तीसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 15 लाख 93 हजार रूपये किंमतीच्या एकूण 47 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असून तीन टोळ्या जेरबंद करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल , पुणे ग्रामीण, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे , पुणे विभाग, जुन्नर उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, राजू मोमीण, पोना संदिप वारे, पोकों अक्षय नवले, चापोकों दगडु विरकर, यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.