आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सांगली-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या तडवळे येथील डोंगराळ भागात बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर शमसुद्दीन शेख यांच्या ९ महिन्यांच्या मुलास बिबट्याने पळवून नेऊन ठार मारले. वन विभागाने या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तळवडे येथे जाईच्या विहिरीजवळ बंडा शामराव पाटील यांच्या शेतात ऊसतोड चालू होती. ऊस तोडण्यासाठी माजलगाव तालुक्यातील आनंदगावच्या शमसुद्दीन शेख या ऊसतोड मजुराने झाडाखाली सावलीत नऊ महिन्यांच्या सुफियानला झोपवले होते. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बाजूलाच असलेल्या ओढ्याच्या दिशेने येऊन बाळाच्या दिशेने झेप घेतली. त्याला जबड्यात पकडून तो पळून गेला. हे पाहताच मजुरांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने बाळाला टाकून पलायन केले. जखमी बाळाला तालुका रुग्णालयात नेण्यापूर्वी रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.