आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:पुण्यातून औरंगाबाद-नगरला कुरिअरने पाठवण्यात येणाऱ्या 97 तलवारी जप्त, पंजाबहून मागवल्या तलवारी, चौघांवर गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबहून कुरिअरद्वारे मागवलेल्या ९७ तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड येथील दिघीतील डीटीडीसी कुरिअर कंपनीत ही कारवाई करण्यात आली. हा शस्त्रसाठा अहमदनगर आणि औरंगाबाद येणार जाणार होता. उमेश सूद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद), आकाश पाटील (रा. चितली, अहमदनगर) मनिंदर (रा. घंटाघर कॉम्प्लेक्स, अमृतसर, पंजाब) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सूद आणि मनिंदर यांनी आरोपी अनिल होन व आकाश पाटील यांना कुरिअरद्वारे घातक शस्त्र पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डीटीडीसी कंपनीत छापा मारून एकूण ९७ तलवारी २ कुकरी आणि ९ म्यान जप्त केले आहेत. दिघी येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीचे वितरण केंद्र आहे. पुण्यातून शस्त्रसाठा औरंगाबाद आणि अहमदनगर येथे जाणार होता. एवढा मोठा शस्त्रसाठा नेमका कशासाठी मागवला होता, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...