आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारींची होम डिलिव्हरी:97 तलवारी कुरिअरने पुण्याला पाठवल्या, औरंगाबाद आणि अहमदनगरला पाठवण्याची होती तयारी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात कुरिअरद्वारे धारदार तलवारी मागवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 97 तलवारी, दोन कुकरी व इतर काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन बॉक्समध्ये भरून या वस्तू पुणे येथे पाठवण्यात आल्या होत्या.

याप्रकरणी उमेश सूद, अनिल होन, मनिंदर आणि आकाश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. पोलिसांनी कुरिअर सेंटरची चौकशी सुरू केली असून तत्पुर्वी कुरिअर सेंटरवर अशा लोकांवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले होते. दिघी परिसरात असलेल्या डीटीडीसी कुरिअर कंपनीचे गोदामात स्कॅनिंग करताना दोन खोक्यांमध्ये ही शस्त्रे आढळून आली आहेत.

जप्त करण्यात आलेल्या सर्व धारदार तलवारी होत्या आणि त्या पुण्याहून इतर शहरात पाठवल्या जाणार होत्या. ही शस्त्रे औरंगाबाद आणि अहमदनगर येथून पाठवली जात होती असे संशयितांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या धारदार तलवारी, पुण्याहून इतर शहरात पाठवल्या जाणार होत्या
पोलिसांनी जप्त केलेल्या धारदार तलवारी, पुण्याहून इतर शहरात पाठवल्या जाणार होत्या

औरंगाबाद, नगरला पाठवणार होते तलवारी

संशयित आरोपी उमेश सूद याने या पेट्या अनिल होन याला पाठविल्या होत्या. या पेट्यांमधून 3 लाख 7 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मनिंदरने संशयित आरोपी आकाश पाटील याला कपड्यात बांधून शस्त्रांचे पार्सल पाठवले होते. तोही या प्रकरणात अडकला आहे. या तलवारी औरंगाबाद आणि अहमदनगर येथे पाठवल्या जाणार होत्या, असे तपासात समोर आले आहे. मात्र, ही शस्त्रे या शहरांमध्ये का पाठवाली जाणार होती याबाबत अद्याप कळू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...