आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगारवाल्याकडे आढळले 1105 बुलेट्स:मोदींच्या दौऱ्यापूर्वी पुणे पोलिसांची कारवाई, 1 लाख 57 हजारांची काडतुसे जप्त

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने पुणे शहरात घेण्यात आलेल्या कोंम्बिग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट एक पर्वती येथील जनतावसाहत मधील एका भंगाराच्या व्यावसायीकाकडून तब्बल 1 हजार 105 गोळ्या जप्त केल्या, यात 56 नग जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट (लीड) अशा 1 लाख 57 हजारांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

भंगार व्यावसायिकाला अटक

दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (34, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत,पुणे, मुळ रा. मंगलपुर ता. कुडा जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायीकाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

1 लाख 57 हजारांच्या गोळ्या जप्त

युनिट एकचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुरूवार पेठेतील गौरी आळी येथे भंगाराचा व्यावसाय करणारा याच्याकडे बंदुकीची काडतुसे ठेवली आहे अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संबंधीत ठिकाणी छापा टाकून युनिट एकने 1 हजार 105 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये 56 नग जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट अशा 1 लाख 57 हजारांच्या गोळ्या जप्त केल्या.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या सुचनेनुसार युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांचा तपास सुरू

''एवढ्या मोठ्या प्रमाणात दिनेशकुमारने काडतुसे कोठून आणली ? ती काडतुसे जवळ कशासाठी बाळगली, त्यातील काडतुसे त्याने कोणाला दिली का त्याचा ही काडतुसे जवळ बाळगण्या मागचा नेमका काय उद्देश होता याचा तपास सुरू आहे.''- संदीप भोसले, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट 1.

बातम्या आणखी आहेत...