आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:शाळेतील समुपदेशनात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचे प्रकरण उघड

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक १५ वर्षीय मुलगी राहत्या घरात एकटी असताना २ मुलांनी तिचा विनयभंग केल्याचा प्रकार मुलीच्या शाळेतील समुपदेशनमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह दोघांवर कोंढवा पोलिसांत विनयभंग व पोक्सो तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. राज रवी कोळी (१८, मूळ रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेले आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह १६ वर्षांच्या विधीसंघर्ष बालकावरही गुन्हा नोंदवला. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने आरोपींविरोधात तक्रार दिली.