आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीच्या खुनाचे गूढ उलगडले,:17 वर्षीय मुलीचा दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली येथे १७ वर्षीय मुलीचा दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. खून करणाऱ्या दोघांपैकी एक जण १७ तर एक जण अवघ्या १४ वर्षांचा आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आलिया आणि आदित्य (नावे बदलली आहेत) चिखली परिसरातील एकाच शाळेत शिक्षण घेत होती. सन २०२० मध्ये त्यांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०२२ मध्ये आलिया गरोदर राहिली. त्यामुळे आलियाने आदित्यवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यात आलिया आणि आदित्य यांचे बिनसले. त्यानंतर आदित्यवर आणखी एक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे तिने त्याच्यासोबत संबंध तोडले. त्यानंतर त्याने तिचाच खून केला.