आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पाषाण परिसरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा शेजारी राहणाऱ्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर आदर्श डाेग्रा (रा.पुणे) याच्यावर चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.माहितीनुसार, पीडित ७५ वर्षीय महिला व आराेपी हे एकमेकांचे घराशेजारी राहतात. घटनेच्या दिवशी आराेपीने विनाकारण महिलेच्या सेफ्टी ग्रील डाेअरवर लाथा मारल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. त्या वेळी आराेपीने आक्रमकपणे व निर्लज्जपणे महिलेशी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच पीडितेचा हात पिरगाळून विनयभंग केला. तपास पाेलिस उपनिरीक्षक एस. भालेराव करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.