आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोलिसावर गुन्हा दाखल:महिलेला मारहाण करणे भोवले; निलंबनाचीही झाली कारवाई

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात एका पोलिसाला महिलेला मारहाण करणे चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी पोलिसावर निलंबनाची कारवाई करून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील मंडई पोलिस चाैकीच्या शेजारी एका बांगडी विक्रेत्या महिलेस दुचाकी दुकाना समाेर पार्क करण्याच्या वादातून 19 ऑक्टाेबरला पोलिस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला हाेता.

भाजपने केला पाठपुरावा

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संबंधित महिलेस मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचारी राहूल शिंगे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत पाठपुरावा केला. अखेर याप्रकरणी शिंगे याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भादंवि कलम 337,323,504 नुसार गुन्हा दाखल करुन त्याचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

घटना काय?

याबाबत पोलिसांकडे कांचन दिपक दाेडे (वय-50) यांनी तक्रार दाखल केली आहे. निलंबीत पोलिस कर्मचारी राहूल शिंगे हा खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दाेडे यांचा बांगडी व्यवसाय असून महात्मा फुले मंडई येथे मंडई पोलिस चाैकी जवळ कालिका कंगण स्टाेअर नावाचे बांगडयाचे दुकान आहे. सदर दुकानात त्या 19 ऑक्टाेबरला असताना, दुपारी 12 ते एक वाजण्याच्या दरम्यान राहुल शिंगे हा पोलिस कर्मचारी त्याठिकाणी आला व त्याने दुकाना समाेरील पाण्याच्या नळाजवळ त्याची माेटारसायकल पार्क केली. त्यामुळे दाेडे यांनी त्यास याठिकाणी दुचाकी पार्क करु नका असे सांगितले असता, त्याचा राग त्याला येऊन त्याने महिलेस शिवीगाळ करुन त्यांच्या ताेंडावर उजव्या डाेळयाजवळ हाताने ठाेसे मारुन दुखापत केली.

पोलिसांनी केला पाठपुरावा

याप्रकरणी त्या पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. मात्र, याबाबत भाजपचे पदाधिकारी चित्रा वाघ, प्रमाेद काेंढरे, पुष्कराज तुळजापूरकर यांनी पुढाकार घेत दाेषी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाईची मागणी करत पोलिसांकडे पाठपुरावा केला. प्रसारमाध्यमांनी ही याप्रकरणास वाचा फाेडल्यानंतर त्याबाबतची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेत अखेर याबाबत संबंधित पोलिस कर्मचारी राहूल शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

याबाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे शहरात दुकानदार महिलेस पोलिस काॅन्स्टेबलने केलेल्या मारहाणी संर्दभात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली. महिलेवर हात उचलणाऱ्या पोलिस शिपाई राहूल शिंगे यांचेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सुरक्षा फक्त घाेषणांमध्ये नाही तर प्रत्यक्षात राबवणारे हे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. जिथे महिला, मुलींवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...