आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा विरोधकांना टोला!:म्हणाले- वाईन आणि दारू यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करताय

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जारदोर निशाणा साधत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

'वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करत आहेत. उगाचच मद्यराष्ट्र वैगेरे म्हणत आणि व्हिडिओ क्लिप काढत सरकारला बदनाम करत आहेत. अनेक राष्ट्रांमध्ये पाण्याऐवजी वाईनच वापरली जाते. हे आपणा सर्वांनाच माहिती आहे, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...