आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:‘जिवंत देखाव्यां’ची धूम; 10 हजार कलाकारांना नवे व्यासपीठ, ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखाव्यांना मागणी

जयश्री बोकील | पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात ‘जिवंत देखावा’ हा ट्रेंड रुजला आहे. मंडपाची रचना अनेकदा ‘लाइव्ह देखाव्या’साठी अनुकूल करण्याचाही ट्रेंड सुरू झाला आहे. राज्यभरातील अनेक मोठ्या शहरांत आता बाप्पांसमोर जिवंत देखावे सादर केले जात आहेत. यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक तसेच सामाजिक देखाव्यांना अधिक मागणी आहे, असे निरीक्षण जिवंत देखावे सादर करण्याचा मोठा अनुभव असणाऱ्या वृंदा साठे यांनी नोंदवले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या चरित्रकथा, हे जिवंत देखाव्यांचे अत्यंत लोकप्रिय साधन आहे. याशिवाय पर्यावरण रक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, देशभक्तिपर प्रसंगांवर आधारित देखाव्यांना प्रचंड मागणी असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो, असे त्या म्हणाल्याप्रेक्षकांचा प्रतिसाद भारावून टाकणारा : उत्सवकाळात लाइव्ह देखावा सादर करणे सर्वात आव्हानात्मक असते. खुल्या जागी सादरीकरण असते. रंगभूमीवरच्या सुविधा नसतात. कमी काळात प्रयोग रंगवायचा असतो, तरीही जिवंत देखावा हा वेगळा अनुभव असतो. प्रेक्षक इथे थेट समोर असतात. त्यांचा प्रतिसाद मोलाचा असतो, असे जिवंत देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या ओंकार मूरकर यांनी तसेच जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या संगीता दळवी यांनी सांगितले.

पडद्यामागच्या कलाकारांनाही मोठे काम : जिवंत देखावा सादर करताना अनेक तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कलाकारांची गरज लागते. त्यामुळे तंत्रज्ञ (रंगभूषाकार, वेशभूषाकार, प्रकाशयोजनाकार, संगीतकार, संहितालेखक, ध्वनिमुद्रक, स्टुडिओ, निवेदक, कपडेपट, युद्धपट सामग्री सांभाळणारी मंडळी, अशा शेकडो जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. राज्यात सुमारे ७ ते ८ हजार पडद्यामागचे कलाकार आणि तंत्रज्ञ जिवंत देखाव्यांसाठी काम करण्यात गुंतले असावेत, असा अंदाज आहे.

1 हजारपेक्षा जास्त देखावे राज्यात 10,000 कलाकारांना नवे व्यासपीठ, सहायक आणि तंत्रज्ञांनाही रोजगार ~1-2 हजार मानधन एका जिवंत देखाव्यासाठी मुख्य कलाकाराला मिळते, इतर कलकारांना त्यापेक्षा कमी 5 प्रयोग जास्तीत जास्त एका दिवसात सायंकाळी ७ ते १० या वेळात 500 प्रेक्षक पाहू शकतात जागेच्या उपलब्धतेनुसार एका वेळी एक शो

8 ते 10 खेळ रात्री १२ पर्यंत मुभा असलेल्या दिवशी 10 ते 25 मि. जिवंत देखाव्याचा कालावधी

हे आहेत जिवंत देखाव्यांचे लाडके विषय {छत्रपती शिवाजी महाराज {जिजाऊ माँसाहेब {संभाजी महाराज {पेशवाईतील प्रसंग {देशभक्तिपर प्रसंग {सर्जिकल स्ट्राइक {पर्यावरण रक्षण {महिला सक्षमीकरण {अंधश्रद्धा निर्मूलन {वैज्ञानिक यश ({मंगळयान {चांद्रमोहीम {क्षेपणास्त्र प्रक्षेपण)

असे आहे जिवंत देखाव्यांचे अर्थकारण शहरे व ग्रामीण भागातही जिवंत देखावे सादर केले जात असले तरी असंघटित स्वरूपातील काम असल्याने ठोस अर्थकारण समोर येत नाही. मंडळाची परंपरा, आर्थिक सक्षमता, मंडपाचा आकार, निवडलेला प्रसंग, कलाकारांची संख्या, अन्य घटक आदींवर मानधन ठरवले जाते. काही ठिकाणी पूर्ण उत्सवकाळाचे मानधन एकत्रित दिले जाते, तर अनेक ठिकाणी ते प्रतिदिवशी दिले जाते. मुख्य कलाकाराला प्रत्येक शोसाठी किमान ५०० ते कमाल २ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. अन्य कलाकारांना या रेंजमध्ये कमीअधिक स्वरूपात पैसे दिले जातात.

बातम्या आणखी आहेत...