आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्याने केली आत्महत्या

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमीन व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाणीत जमीन मालकास हातउसने दिलेले ६१ लाख ५० हजार रुपये परत न केल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकारणी पाेलिसांनी पाच जणांवर येरवडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दाेघांना अटक केल्याची माहिती शनिवारी दिली. अजयकुमार विरदीचंद बेदमुथा (४६, रा.येरवडा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांची पत्नी प्रतिमा बेदमुथा (४०) यांनी येरवडा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी हेमंत माेहनलाल भंडारी (६०) व माेनीश हेमंत भंडारी (२२, दाेघे रा.खेड,पुणे) या दाेन आराेपींना अटक केली आहे. त्यांच्यासह आरती माेनीश भंडारी, (२८), हर्षल बलदाेडा (४५) व किरण पवार (२७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...