आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:उर्से टोल नाक्यावर थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून धडक; 4 जण ठार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • }साताऱ्याच्या अपघातामुळे लोणंद-नीरा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाका परिसरात मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारने महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. मृतांची अद्याप ओळख पटली नाही. भरधाव असलेली कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. भरधाव असल्याने चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मृतांची ओळख पटली नसून पोलिस ओळख पटवत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येणार आहे.

साताऱ्यामध्ये एसटी-दुचाकीच्या अपघातात तीन तरुण जागीच ठार सातारा| लोणंद-नीरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर झालेल्या एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बुद्रुक-थोपटेवाडी, ता. पुरंदर), अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे लोणंद-नीरा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी आणि नीरेकडून लोणंदकडे निघालेली दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील तिन्ही तरुण जागीच ठार झाले. घटनेनंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.