आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक!:अक्षर चांगले नाही म्हणून पहिलीतल्या मुलाला मारहाण; पुण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पहिलीतल्या मुलाचे अक्षर सुंरद नसल्याचा कारणावरून वर्गशिक्षकेने त्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुन्हा मारण्याची धमकी

तक्रारदार यांचा सहा वर्षाचा मुलगा वानवडी परिसरातील लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहे. मात्र, मुलाचे अक्षर चांगले नसल्याने संबंधित शिक्षिका वारंवार त्याला ओरडत हाेती. दरम्यान, शिक्षिकेने राग अनावर झाल्यानंतर मुलास हाताने बेदम मारहाण केली. तसेच जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला पुन्हा वर्गात आल्यावर आणखी मारण्याची धमकी शिक्षिकेने दिली. मात्र, मुलाने संबंधित घडलेला प्रकार घरी जाऊन पालकांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठत आराेपी शिक्षिके विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वानवडी पोलिस करत आहे.

पुण्यातील 22 वर्षीय तरुणीला ओळखीच्या एका तरुणाने दुचाकीवरुन ऑफीसला जात असताना, तिची दुचाकी रस्त्यात अडवून तिच्या गाडीला स्वत:ची गाडी आडवी लावून तिचा रस्ता अडवला. त्यानंतर तिला पाठलाग करुन तिचे ऑफीस जवळून जबरदस्तीने स्वत:चे गाडीवर बसवुन बाेपदेवघाट येथे तिची इच्छा नसताना घेऊन जात तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला. परंतु त्यास तरुणीने नकार दिला असता तिला स्वत:चे जीवाचे बरेवाईट करुन घेईन अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणिने फराखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आराेपी दिक्षांत प्रशांत वाघमारे (वय-22,रा.पुणे) यास अटक केली आहे. सदरचा प्रकार 25 नाेव्हेंबर राेजी घडल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...