आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील घटना!:साेलर पाॅवर प्लांटचे 74 लाख रुपये न देता व्यवसायिकाची फसवणूक, गुन्हा दाखल

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्हयात शिवाजी गाव येथे एका व्यवसायिकाकडून दाेन मेगावॅटचा ग्राऊंड माऊंटेड पाॅवर प्लांट बनवून घेत, ठरल्याप्रमाणे ऑर्डरचे 74 लाख 39 हजार रुपये न देता एका व्यवसायिकाची फसवणुक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मधुकर श्रीरंग काशीद (वय-66,रा.दत्तवाडी,पुणे) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाेन आराेपीं विराेधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रविंद्र यशवंत मेंहदळे आणि अच्युत मेहेंदळे (रा.पर्वती,पुणे) या आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवीगाळ करून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13/4/2022 ते 22/11/22 यादरम्यान घडलेली आहे. तक्रारदार मधुकर काशीद यांचेकडून आराेपी यांनी दाेन मेगावॅटचा ग्राऊंड माऊंटेड साेलार पाॅवर प्लांट कर्नाटक येथे बनविण्याची वर्क ऑर्डर दिली. ठरल्या व्यवहाराप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे काम तीन महिन्यात पूर्ण करुन त्या कामाची रक्कम 74 लाख 39 हजार रुपये आराेपींकडे मागितले. परंतु आराेपींनी त्यांना बँकेची बनावट गँरटी देवून त्यांची फसवणुक केली. तक्रारदार यांनी आराेपींकडे पैशाची मागणी केली असता, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहे.

बेकायदेशिरित्या पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

बेकायदेशिररित्या देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्‍या एकाला गुन्हेशाखेच्या युनिट 3 ने अटक केली. यावेळी त्याच्याकडून 40 हजार रूपये किंमतीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.अमोल बाळासाहेब बोरकर (38 वर्ष , रा.काळेपडळ, हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासणे व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना युनिट 3 चे अमंलदार राकेश टेकावडे यांना एक अनोळखी व्यक्ती हडपसर येथील ससाणेनगर मधील गंधर्व हॉटेल जवळ संशयीतरित्या थांबला असल्याची व त्याच्याकडे गावठी कट्टा (पिस्टल) असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल लावल्याचे आढळले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजीतकुमार पाटील पोलिस अंमलदार संतोष क्षीरसागर, दिपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, प्रताप पडवाळ यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...