आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात धक्कादायक घटना:शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 11 वर्षांच्या मुलाची आत्महत्या; माय - लेकींवर गुन्हा दाखल

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 11 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना पुण्यातील लोहिया नगर येथे घडली.

मुलाच्या आत्महत्येप्रकरणी आई आणि मुलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याता आला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

सव्वासातची घटना

रुद्राक्ष लुकेश जाधव (वय 11, रा. लोहिया नगर,पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आई विद्या चंद्रकांत कांबळे आणि मुलगी साधना चंद्रकांत कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. दरम्यान आशा लुकेश जाधव (वय 32) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार 11 ऑक्टोबरला सकाळी सव्वासात वाजता घडला होता.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूद्राक्ष जाधव व त्याचे कुटुंब लोहियानगर येथे राहण्यास आहे. रूद्राक्षला वारंवार घरी येण्यावरून दोघी मायलेकींनी शिवीगाळ केली. त्या रागातून तसेच त्यांच्या त्रासातून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रूद्राक्ष सहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील वाहन चालक म्हणून एकाठिकाणी काम करतात तर आई एका बागेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. दरम्यान कांबळे व जाधव कुटुंब एकमेकांना ओळखत होते. पण, त्यांच्या त्रासाला कंटाळूनच रुद्राक्षने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांना उशिराने दिल्यानंतर रुद्राक्षला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.

सतत शिवीगाळ

खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी याबाबत सांगितले की, सदर मुलाचे वडील चालक असून आई सुरक्षारक्षक आहे. घटनेच्या दिवशी मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर थेट आईला भेटण्यासाठी त्या काम करत असलेल्या ठिकाणी गेला. घराशेजारील महिला त्याला सतत शिव्या देत असल्याने, तिला समजावून सांग अशी तक्रार त्याने रडत रडत आईकडे केली. त्यानंतर तो घरी गेला होता. घरी गेल्यानंतर राहत्या घरात त्याने गळफास घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात सखोल चौकशी पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...