आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार दाखल:पत्नीला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या पतीसह दोन मित्रांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाची गरज भागवण्यासाठी स्वतःच्या पत्नीस मारहाण करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह त्याच्या दोन मित्रांवर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या ३१ वर्षीय पतीसह त्याचे मित्र आदित्य गौतम (रा.कसबा पेठ, पुणे) आणि सुजित पुजारी (रा.आंबेगाव ,पुणे )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी पीडितेला मारहाण करून उंड्री-हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास मागील दोन वर्षापासून जबरदस्तीने भाग पाडले. मित्र आदित्य गौतम आणि सुजित पुजारी यांच्याकडून त्याने प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.