आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज मंजूरीच्या आमिषाने 22 लाखांचा गंडा:तिघांविरुद्ध पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेल व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने आरोपींनी एकाला 22 लाख 50 हजारांचा गंडा घातला. ही घटना सप्टेंबर 2019 ते नोव्हेंबर 2022 कालावधीत शंकरशेठ रस्त्यावरील एचडीएफसी बँकेत घडली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

राजेंद्र प्रल्हाद गोसावी (वय 38 रा. शिवणे,पुणे), फिरोज खलीली शेख (रा. मोदीखाना वॅâम्प,पुणे), अब्बास शब्बीर भोरी (वय 39 रा. रविवार पेठ,पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. धनेश भगवान कुताळ (वय 41 रा. वडगाव शेरी,पुणे) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हॉटेल व्यावसायासाठी कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने आरोपींनी फिर्यादी धनेश यांच्या अलिशान मोटारीची कागदपत्रे ताब्यात घेतली. संबंधित मोटार रूपेश पाटील यांच्याकडे गहाण ठेउन 10 लाख रूपये व्याजाने घेतले. त्याबदल्यात दरमहिन्याला एक लाख रूपये धनेशला भरण्यास भाग पाडले. त्यानंतर शंकरशेठ रस्त्यावरील एचडीएफसी बँकेत 2 कोटी 10 लाखांचे कर्ज मंजूरीसाठी त्यांच्याकडून आणखी साडेसहा लाख रूपये घेतले. बनावट पत्र पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे सांगत 22 लाख 50 हजारांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस घाडगे तपास करीत आहेत.

रिक्षाचालकावर वार करून मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न

रिक्षाचालकाचा पाठलाग करून सिग्नलवर थांबले असता त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करीत चाकुने वार केल्याची घटना 2 नोव्हेंबरला येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये घडली. अक्षय ईश्वर चव्हाण (वय 28, रा. गांधीनगर, येरवडा,पुणे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय रिक्षाचालक असून 2 नोव्हेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रवाशी घेउन चालले होते. त्यावेळी शास्त्रीनगर चौकात दुचाकीस्वार चोरट्याने त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षयने चोरट्यांना विरोध करीत जाब विचारला. त्यावेळी त्यांनी चावूâने वार करून अक्षयला जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल डोंबाळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...