आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या टाकीत बुडून लहान मुलीचा मृत्यू:पुण्यातील घटना, ठेकेदारासह दोन जणांवर गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मांगडेवाडी परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शुक्रवारी (11 नोव्हेंबरला) ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी (12 नोव्हेंबरला) दिली आहे.

घटनेनंतर ठेकेदारासह दोन जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सिका सुनील सहानी (वय-2) असे मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याबाबत सुनील सहानी (वय-27,रा.मांगडेवाडी,पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार सहानी हे सदर बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करत हाेते. त्यावेळी पाण्याच्या टाकीस बांधकाम व्यवसायिक व ठेकेदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने टाकीस झाकण न लावता, चारही बाजूने सुरक्षित जाळी न लावता व काेणतेही सुरक्षा व्यवस्था, उपाय याेजना न करता पाण्याची टाकी उघडी ठेवली त्यामुळे संबंधित टाकीत पडून अन्सिका हिचा टाकीतील पाण्यात पडून दुर्दवीरित्या मृत्यु झाला आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव करत आहे.

वहिनीचा खून करणारा आराेपी जेरबंद

वहिनीने करणी केल्याच्या संशयावरुन दीराने तिचा धारदार चाकुने गळा कापुन व पाेटात खुपसून वार करुन तिचा निघृण खून केल्याची घटना शुक्रवारी घडली हाेती. त्यानंतर पसार झालेल्या आराेपीचा पोलिसांनी शाेध घेत त्यास जेरबंद केल्याची माहिती शनिवारी दिली आहे. श्रीनिवास जगन्नाथ श्रीराम (वय-59,रा.पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

लक्ष्मीबाई श्रीराम (वय-54) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात चंदननगर पोलिस ठाण्यात सागर दासा (39,रा.वडगाव शेरी,पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. चंदननगर परिसरात बिडीकामगार वसाहत मध्ये मयत लक्ष्मीबाई श्रीराम राहतात. तक्रारदार यांच्या घरी परडी भरण्यासाठी लक्ष्मीबाई शुक्रवारी दुपारी आल्या असताना तक्रारदार हे त्यांना अडचण सांगत असताना, त्याठिकाणी महिूलेचा दिर आराेपी श्रीनिवास श्रीराम त्याठिकाणी आला. त्याचे घरावर लक्ष्मीबाई हिने करणी केल्याच्या संशयावरुन व आईस भेटून देत नाही याकारणावरुन लक्ष्मीबाई हिस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने गळा कापून व पोटात खुपसून वार करुन त्यांचा खून करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्दीनाथ खांडेकर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...