आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विराेधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईलवर एक ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली होती. ध्वनीचित्रफित महिलेच्या पाहण्यात आली. त्यात माजी आमदार जाधव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचे आढळून आले.
जाधव यांनी समाजमाध्यमावर गृहमंत्री शहा आणि पालकमंत्री पाटील यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दत्तवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये महिलांविषयी घाणेरडी भाषा करुन लैंगिक स्वरुपाचे टोमणे मारले आहेत. हे ऐकून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दत्तवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव देखील प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
कोरेगाव पार्क भागातील वस्त्रदालनात ग्राहकाचे अश्लील कृत्य
कोरेगाव पार्क भागातील एका वस्त्रदालनात कर्मचारी युवतीसमोर एका ग्राहकानेअश्लील कृत्य केले. वस्त्रदालनातील एका कक्षात ही घटना घडली. या प्रकरणी ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 23 वर्षीय युवतीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती कोरेगाव पार्क भागातील एका वस्त्रदालनात कर्मचारी आहे. दुपारी तीनच्या सुमारास एक जण वस्त्रदालनात खरेदीच्या बहाण्याने आला. त्या वेळी वस्त्रदालनात युवती एकटी होती. आरोपी ग्राहकाने युवतीकडे मोबाइलक्रमांक मागितला. ग्राहकाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ग्राहकवस्त्रदालनातील वस्त्र बदलण्याच्या कक्षात गेला. त्या वेळी त्याने अश्लीलहावभाव केले.त्यानंतर ग्राहक वस्त्रदालनातून निघून गेला.या घटनेमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.