आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Case Of Embezzlement Of Rs 33 Lakh Has Been Registered Against The Ex chairman Of The Co operative Housing Society And Its Office bearers

क्राईम:सहकारी गृहरचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर 33 लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील कोथरूड परिसरातील वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह तीन पदाधिकारी आणि दोन लेखा परिक्षकांनी तब्बल 33 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह पाच जणांवर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सचिव नितीन सुर्वे, माजी खजिनदार प्रकाश सोलकर (सर्व रा. वनाज सोसायटी, कोथरूड,पुणे), लेखा परिक्षक एम.आर. सलगर (रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे) आणि लेखा परिक्षक धनश्री रत्नाळीकर (रा. पाषाण, पुणे) या आरोपीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लेखा परिक्षक प्रतिभा सुरेंद्र घोडके (वय- 51, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार हा सन 2014-15 ते सन 2018-19 दरम्यान वनाज सहकारी संस्था येथे घडला आहे. वनाज सहकारी गृह रचना संस्थेचे संबधित आरोपी पदाधिकारी असताना त्यांनी 33 लाख 22 हजार 387 रूपये रक्कमेचा अधिकारात बेकायदेशीर गैरवापर केला. त्यांनी सदर रक्कमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. हे संस्थेच्या अभिलेखावर असतानाही त्याचे लेखा परिक्षण करणारे लेखा परिक्षक सलगर व रत्नाळीकर यांनी वास्त परिस्थिती व आर्थिक बाबी त्यांचे लेखा परिक्षण अहवालात न मांडता, वनाज संस्थेचे नमूद पदाधिकारी आरोपी यांनी केलेल्या अपहारास संगणमताने सहाय्य केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहे.