आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ:अनधिकृतरित्या हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरसह 8 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस सुरूच आहे. अशातच पुण्यातील हवेली परिसरात वाघोलीतील सिद्धार्थनगर येथे एका डॉक्टरने अनधिकृतरित्या हॉस्पिटल चालवत रुग्णांच्या जीवाशी खेळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टरसह 8 जणांवर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मंगळवारी दिली.

हे आहेत आरोपी

डाॅ.शशिकांत सयाजीराव निकम, डाॅ. विद्यानंद माणिकराव भिल्लारे, प्रकाश दगडू चव्हाण, गाेविंद चव्हाण, दीपक पांडुरंग चव्हाण, शशिकांत चव्हाण, भामाबाई चव्हाण आणि सुनिता चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे.

गुन्हा दाखल

सदरील, याप्रकरणी नरेंद्र आनंद वाघमारे (वय-33,रा.वाघाेली,पुणे) यांनी याबाबत आराेपी विराेधात लाेणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरील हा प्रकार 2014 पासून फेब्रुवारी 2022 यादरम्यान हा प्रकार वाघाेलीतील न्यू माताेश्री मल्टी स्पेशालिस्ट हाॅस्पिटल याठिकाणी घडलेला आहे.

नक्की प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आराेपींनी डाॅ.शशीकांत निकम आणि डाॅ.विद्यानंद भिल्लारे यांच्याशी संगनमत करुन वाघाेली परिसरात 2014 पासून न्यू माताेश्री मल्टी स्पेशालिस्ट नावाचे अनाधिकृत हाॅस्पीटल सुरू केले. सदर हाॅस्पिटल मध्ये रुग्णांच्या जिवितास व आराेग्यास धाेका निर्माण हाेईल असे हयगईचे कृत्य करुन नागरिकांची तसेच शासनाची फसवणुक केली. तसेच तक्रारदार नरेंद्र वाघमारे यांनी संबंधित हाॅस्पिटल विराेधात केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन आराेपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वाईट शिवीगाळ करुन ‘तुझी वकीली कशी चालते, ते आम्ही पाहुन घेताे अशी धमकी दिली. तसेच तुझ्यावर व तुझ्या कुटुंबियावर खाेटेया केसेस टाकताे तसेच तुझे कुटुंबाला संपविल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी धमकी दिल्याने संबंधित आराेपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास लाेणीकंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. पवार करत आहे.

थुंकल्याने नाकाचे हाड मोडले

बालेवाडी हायस्ट्रीट समाेरील मेमाेज दुकाना समाेरील फुटपाथवर 30 ऑक्टाेबर राेजी रात्री विपुल नाथ (वय-31,रा.बालेवाडी,पुणे) हा तरुण पायी चालत जात हाेता. त्यावेळी त्याठिकाणी उभ्या असणाऱ्या दाेन अज्ञात 30 वर्ष वयाेगटातील तरुणांनी त्यास अडवून तू आमच्या पायावर थुंकल्याचे कारण सांगत त्याच्या ताेंडावर व नाकावर हाताने बुक्के मारुन त्याचे नाकातून रक्त येवूुन नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. तर दुसऱ्या आराेपीने तक्रारदार यास हाताने व लाथाने मारुन त्यांना आडवून मारहाण व शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...