आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेगवेगळ्या व्यावसायिकांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे. याप्रकरणी अॅड. विक्रम भाटे (वय -34, रा. हडपसर,पुणे) आणि वैभव शिंदे (वय -34) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
संबंधित प्रकार वाघोलीत जून 2021 ते 25 जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे. हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कारची बनावट केस करण्याची धमकी देऊन अॅड. विक्रम भाटे याने 17 लाखांना लुबाडले होते. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.सदर प्रकरणातील व्यावसायिकाच्या ओळखीच्या एका पीडित महिलेने याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व वैभव शिंदे, अॅड. विक्रम भाटे हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. ते तक्रारदार महिलेच्या घरी आले. त्यांनी कोल्ड्रींकमध्ये काही तरी मिसळून त्यांना आग्रह करुन पिण्यास दिले. त्यानंतर महिला गुंगीच्या अवस्थेत गेल्यावर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या नकळत व्हिडिओ चित्रण आरोपींनी केले.
ते पीडित महिलेस दाखवून तिला दुसर्यासोबत बळजबरीने शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे ही चित्रीकरण करुन त्या व्यावसायिकांना लुबाडले गेले. हडपसरमधील तक्रारदार व्यावसायिकालाही अशाचप्रकारे हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास महिलेस सांगितले होते. परंतु, तिने तो ओळखीचा असल्याने त्यास नकार दिला.त्यामुळे दुसर्या तरुणीची भाटे याने मदत घेतली होती.
भाटे व इतर साथीदार अशाप्रकारे फसवणूक करीत असल्याचे पिडीतेने व्यावसायिकाला सांगितल्यावर त्याने पोलिसांकडे धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. दुसर्यांबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.