आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान:हिंदू महासंघाकडून काेर्टात याचिका, ड्रग्जप्रकरणी मे महिन्यात मिळाली हाेती क्लीन चिट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझवरील अमली पदार्थप्रकरणी झालेल्या गुन्ह्यातून पोलिसांनी यंदा मे महिन्यात निर्दोष मुक्त केले होते. त्याच्या जवळपास ६ महिन्यांनंतर याप्रकरणी हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आर्यन खान याच्यासह सहा जणांना सबळ पुराव्याअभावी पोलिसांनी निर्दोष सोडले असून याबाबत न्यायालयाने फेरतपासणी करून संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, याचिकाकर्ते प्रीतम देसाई आणि ॲड. सुबोध पाठक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ॲड सुबोध पाठक म्हणाले, आर्यनने तपास अधिकाऱ्यांपुढे गुन्हा कबूल केला होता. त्याच कारणास्तव सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन सबळ पुरावा नसल्याचे कारण देत दोषारोपपत्रातून मुक्त केले आहे. आरोपींना निर्दोष मुक्त करून पोलिसांनी न्यायालयाच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. कायद्यापेक्षा आर्यन मोठा आहे का हा प्रश्न निर्माण होतो आहे.

बातम्या आणखी आहेत...