आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंचे नाव घेऊन मेट्रोच्या व्यवस्थापकाला मागितले पैसे:पोलिसांत तक्रार दाखल, आरोपीचा शोध सुरू

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून एकाने मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थापकाकडे पैशाची मागणी करण्यात आली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दम देण्यात आला. शुक्रवारी (९ डिसेंबर) चिखली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवदास साधू चिलवंत यांनी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेट्रोच्या सुरक्षेसाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. तक्रारदार शिवदास हे संबंधित सुरक्षा एजन्सीमध्ये व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी सकाळी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यांनी फोन घेतला असता समोरून मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलतो आहे, असे सांगून त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात केली.

बातम्या आणखी आहेत...