आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:सचित्र ‘विष्णू अवतार’ हस्तलिखिताची प्रत 22 वर्षांनी जपानमधून पुण्यामध्ये झाली दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीडशे वर्षांपूर्वीच्या हस्तलिखितामध्ये 60 चित्रांचा आहे खास समावेश

पुस्तकात चित्रे वापरण्यासाठी जपान येथे नेण्यात आलेले ‘विष्णू अवतार’ हे सचित्र हस्तलिखित पत्रव्यवहारानंतर २२ वर्षांनी पुण्यामध्ये दाखल झाले आहे. तब्बल ६० चित्रांचा समावेश असलेले ‘विष्णू अवतार’ हे हस्तलिखित सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे आहे.

टेंभुर्णीजवळील (जि. सोलापूर) सापटणे या गावी भालचंद्र जोशी यांच्याकडे असलेले ‘विष्णू अवतार’ हे सचित्र हस्तलिखित १९९८ मध्ये भांडारकर प्राच्यविद्याा संशोधन संस्थेला मिळाले होते. यात विष्णूच्या राम, कृष्ण व परशुराम अशा अवतारकथा खास मराठमोळ्या शैलीमध्ये रंगविलेल्या होत्या. या हस्तलिखितामधील चित्रांतील महिला नऊवारी साडीमध्ये, तर पुरुष धोतर आणि बंडी या पेहरावामध्ये दाखविण्यात आले होते, अशी माहिती भांडाकर प्राच्यविद्याा संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली. जपानमधील टोकियो विद्यापीठातील प्रा. शिमिझू यांनी १६४८ मधील सचित्र भागवत पुराणाचे पुस्तक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे तत्कालीन मानद सचिव आणि ज्येष्ठ प्राच्यविद्याा संशोधक डॉ. रा. ना. दांडेकर यांच्या संमतीने प्रकाशित केले होते. त्यांना ‘युनेस्को’च्या जपान शाखेचे अर्थसाह्य लाभले होते. त्यानंतर प्रा. शिमिझू यांनी त्यांच्या संशोधन कार्याच्या पुस्तकासाठी ‘विष्णू अवतार’ या सचित्र हस्तलिखिताची छायाचित्रे टिपली होती.

ग्रंथ प्रकाशित नाही : वर्षभरापूर्वी प्रा. शिमिझू यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांनी नेलेली छायाचित्रे तसेच निर्मिती करण्यात आलेला ग्रंथ पाठवावा, अशी विनंती केली होती, असे मंजूळ यांनी सांगितले. हा ग्रंथ प्रसिद्ध झाला नाही, पण त्यांनी टिपलेली हस्तलिखिताची पृष्ठे आणि त्यातील छायाचित्रे रंगीत झेरॉक्स स्वरूपात परत पाठविली. त्यामुळे दुर्मिळ असलेले हे सचित्र हस्तलिखित २२ वर्षांचा प्रवास करून पुण्याला पोहोचले, असेही मंजूळ यांनी सांगितले.

0