आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:विवाहाच्या आमिषाने डाॅक्टर तरुणीची फसवणूक; डाॅक्टरवर गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहाच्या आमिषाने एका डाॅक्टर तरुणीची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका डाॅक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाॅ. इम्रान इलाही मुलाणी (४१, रा. चर्मकार गल्ली, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डाॅक्टर तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार डाॅक्टर तरुणी आणि डाॅ. मुलाणी यांची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी डाॅ. मुलाणीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवले होते. तरुणी बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात कामाला आहे. डाॅ. मुलाणीने तरुणीच्या नावावर चार लाख सात हजार रुपयांचे कर्ज काढले होते. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने विवाहास नकार दिला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर डाॅ. मुलाणीने लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...