आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात महिला पोलिस निरीक्षकाचे कर्करोगाने निधन:वयाच्या 50 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पोलिस दलात हळहळ

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती विवेक देसाई (वय 50) यांचे रविवारी रात्री कर्करोग आजाराने निधन झाले आहे. सध्या त्या पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात विशेष शाखेत कार्यरत होत्या.

स्वाती देसाई या मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गणेशवाडी गावच्या रहिवासी आहे. त्यांनी जवळपास 25 हून अधिक वर्षे महाराष्ट्र पोलिस दलात विविध पदावर सेवा केली आहे. त्यांनी काहीकाळ सीआयडी, एसबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले होते.

असा होता प्रवास

स्वाती देसाई यांनी पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील आर्थिक विभागात काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. दोन वर्षापेक्षा अधिक काळ काम करत त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. सहकानगर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक जटील गुन्ह्यांचा तपास ही लावल्याने त्या चर्चेत राहिल्या होत्या.लहान मुलावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले होते. प्रेयसीच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणार्‍याला तातडीने पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले होते.

चोरट्यांची टोळी होती पकडली

पीएमपी बसमध्ये चोर्‍या करणार्‍या चोरट्यांची टोळी त्यांनी पकडली होती. सहकारनगर पोलिस ठाण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर त्यांची बदली पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात विशेष शाखेत सहा महिन्यापूर्वी झाली होती. यादरम्यान त्यांचे कर्करोग बाबत उपचार रुग्णालयात सुरू होते. डॉक्टरांच्या औषधाने त्यांना काहीकाळ फरक पडला असल्याने त्यांची तब्येत व्यवस्थित होती.

अकाली मृत्यूने हळहळ

विशेष शाखेत काम करत असतानाच त्यांचा कर्करोगाने अकाली मृत्यू झाल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वाती देसाई यांचे अचानक निधन झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...