आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये आग:पुण्यात सातमजली इमारतीतील हॉटेलला आग

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी वर्दळीचा परिसर असलेल्या कोंढव्यातील एका सातमजली इमारतीत टेरेस हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या आणि २ टँकर आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकातल्या मार्वल विस्टा बिल्डिंगमध्ये (पीएनजी ब्रदर्स) ही आग लागल्यानंतर जवानांनी तत्काळ आग विझविली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले, असून परिसरात कूलिंग करण्याचे काम नंतर करण्यात आले. सातव्या मजल्यावर वेहेजेटा नावाचे एक हॉटेल असून या आगीत रेस्टॉरंटचे मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. या आगीची घटना नेमकी कशामुळे घडली याचा उलगडा झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...