आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:दारूचा ग्लास सांडला म्हणून केला मित्राचा खून

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोघे जण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून तो कचरा महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासात समोर आले. तो पिंपरी-चिंचवड परिसरात फिरस्ती होता.

पोलिसांनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे रोडच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. आरोपी नीलेश व मृत हे एकत्र दारू पीत होते. बालाजीकडून नीलेशचा दारूचा ग्लास सांडला. त्यावरून नीलेशने काठीने मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...