आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्‍हेत मोबाइल हिसकाविणारी टोळी अटकेत:सिंडगड पोलिसांची कारवाई

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरूणांचा पाठलाग करून त्यांच्याकडील मोबाइल हिसकाविणार्‍या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तीन डिसेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास नर्‍हेतील भुमकर चौकाजवळ घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

रतिशकुमार प्रमोण सहाणी (वय 22, रा. वाघोली,पुणे) मुकेश हरिश्चंद्र सहाणी (वय 24 रा. आंबेगाव बुद्रूक,पुणे ) , मनीषकुमार मनोज सहाणी (वय 23 रा. आंबेगाव,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विजय आटपाडकर (वय 25 रा. आंबेगाव,पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

टोळक्यांकडून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हे तीन डिसेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास भुमकर चौकातून पायी चालले होते. त्यावेळी टोळक्याने त्यांना अडवून मारहाण करीत १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. त्याशिवाय परिसरातून जाणार्‍या दुसर्‍या तरूणाकडील मोबाइल हिसकावून टोळके पसार झाले होते. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आरोपींना बेड्या घातल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्या पथकाने केली आहे.

देखभाल करणार्‍याने चोरले दागिने

आजारी असलेल्या जेष्ठ महिलेकडे काम करणार्‍याने तब्बल 1 लाख 43 हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना बालेवाडीतील शिवनेरी पार्क सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी जेष्ठाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 25 ते 29 नोव्हेंबर कालावधीत घडली आहे.

फिर्यादी जेष्ठ नागरिक यांची बहीण आजारी असून त्यांच्या सेवेसाठी एकजण काम करीत होता. घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून त्याने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 62 हजार 500 रूपयांची सोन्याची चेन, 75 हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, पाच हजारांची रोकड असा 1 लाख 42 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार गोरक्षनाथ काळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...