आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील हॉटेल मॅनेजर खून प्रकरण:प्रेम प्रकरणातून खून झाल्याचे उघडकीस; 48 तासांत लावला छडा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल गारवा बिर्याणीच्या मॅनेजरचा दोन दिवसांपूर्वी धायरी येथील धायरेश्वर मंदिराजवळील एका कंपनीच्या जवळील रिकाम्या जागेत खून करण्यात आला होता. या खुनाचा पोलिसांनी तात्काळ छडा लावला आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपसात उघडकीस आली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

गारवा हॉटेलचा मॅनेजर भरत भगवान कदम (वय- 24 ) हे हॉटेल बंद करून घरी जात असतांना धायरीत एका कंपनी समोर रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी भरत यांचा भाऊ प्रकाश कदम यांनी तक्रार आहे. अनिकेत अरुण मोरे (वय 25 वर्षे रा. धायरी पुणे), धीरज शिवाजी सोनवणे (वय 19 वर्षे रा.कोथरुड पुणे),सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (वय 19 वर्षे रा. कोथरूड पुणे) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला. त्यावेळी यातील मयत भरत कदम व आरोपी अनिकेत मोरे हे एकमेकांचे ओळखीचे असुन याच्यामध्ये सुमारे चार ते पाच महिन्यापुर्वि एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधाच्या अनुशंगाने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी याने त्याचा मावस भाऊ धीरज सोनवणे व त्याचे मित्र याचे करवी मयताचा खुन केल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी ही अमिताभ गुप्ता पोलिस आयुक्त, संदिप कर्णिक पोलिस सह आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेक्षिक विभाग, पोर्णिमा गायकवाड पोलिस उप-आयुक्त, परि 3, सुनिल पवार, सहा. पोलिस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जयंत राजुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सचिन निकम, सहा. पोलिस निरीक्षक, दिपक कादमाने सहा. पोलिस निरीक्षक आबा उत्तेकर, सुनिल चिखले, सहा. पोलिस फौजदार, पो. हवा. संजय शिंदे, पोलिस अंमलदार अमित बोडरे, अमेय रसाळ देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी शिरसागर, अविनाश कांडे, अमोल पाटील, स्वप्नील नगर विकास पंडुळे, विकास बांदल, सागर शेडगे, केतन लोखंडे, गणेश गौतम किरतकुडये संतोष शंडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...