आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Leopard That Came For Hunting Entered The House. The Leopard Chased The Hunter And Entered The House Directly, Causing Excitement In The Village; Leopard Jailed

बिबट्या शिकारीचा पाठलाग करत थेट घरात शिरला:नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून बिबट्या पकडण्यात यश

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौजे हेळवाक (ता पाटण, जिल्हा सातारा ) येथील सुधीर कारंडे यांच्या पाळीव कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या थेट त्यांच्या घरात शिरलेला बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री अडकला.

नेमकी घटना काय?
बिबट्या घरात आल्याचे दिसताच कारंडे यांनी घराचे दार बंद केल्याने तो घरातच अडकून पडला. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली होती. अंगणातील कुत्रा घाबरून घरात पळत आला, त्या मागोमाग त्यास पकडण्यासाठी बिबट्याही आत आला. अचानक घरात बिबट्या दिसतात सुधीर घराच्या बाहेर पडले अन त्वरित दार बंद करून घेतले होते.

मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना घटनेची माहिती देण्यात आली. भाटे यांनी त्वरित सातारा व पाटणच्या वनविभागास घटनेची माहिती दिली. रात्री उशीरा पर्यंत वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल (हेळवाक) संदीप जोपाळे , वनक्षेत्रपाल (कोयना) संदीप कुंभार व वन्यजीव विभागाचे वनपाल व वनरक्षक हे तत्परतेने घटनास्थळी पोहचले व बिबट्यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. मध्यरात्री दोनच्या दरम्यान बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. तो बिबट्या लहान (वर्षभराचा) असून त्याच्या एका डोळ्यास बहुतेक मोतीबिंदू झालेला असावा, तर मागील उजव्या पायाने तो लंगडत आहे. सदर बिबट्यास वैद्यकीय पुढील उपचारासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे. बिबट्यास सुखरुप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे , वनक्षेत्रपाल संदीप कुंभार , व सर्व वन्यजीव विभागाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले. स्थानिकांनी ही मोठे सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...