आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A Major Operation By The Customs Department At Pune Airport Seized Gold Biscuits Of One Kg; There Were Biscuits Under The Passenger Seats In The Plane

कस्टम विभागाची पुण्यात विमानतळावर मोठी कारवाई:एक किलोची सोन्याची बिस्किटे जप्त; विमानात प्रवाशांच्या सीटखाली होती बिस्कीटे

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईहून पुणे विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानातून आलेल्या एका प्रवाशाने एक किलाे 166 ग्रॅम वजनाची साेन्याची दहा बिस्कीटे पुण्यातील लाेहगाव विमानतळावर कस्टम विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. प्रवाशांच्या सिटखाली एका काळया रंगाच्या प्लास्टिकच्या एका पिशवीत ही साेन्याची दहा बिस्किटे मिळून आल्याची माहिती पुणे कस्टम विभागाने दिली आहे.

याबाबत कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून स्पाईस जेटचे एसजी-52हे विमान दाखल झाले हाेते. सदर विमान पुढे देशांतर्गत वाहतूकीसाठी रवाना हाेणार हाेते. परंतु त्यापूर्वी विमानाची सीमा शुल्क विभागाकडून नियमितपणे सखाेल तपासणी करण्यात येत हाेती.

त्यावेळी विमानात एका प्रवाशांच्या सिटखाली काळया रंगाच्या प्लास्टिकच्या एका पिशवीत दहा साेन्याची बिस्कीटे कस्टम विभागाच्या पथकास मिळून आली आ​​​​​​​हे. कस्टम विभागाच्या पथकाने सदर साेने सीमाशुल्क कायदा 1962 नुसार जप्त केले असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आ​​​​​​​हे. बाजारभावानुसार सदर एक किलाे 166 ग्रॅम वजनाच्या दहा बिस्कीटांची किंमत 61 लाख 70 हजार रुपये आहे. नेमके हे साेने तस्करी करुन काेणी आणले हाेते आणि ते काेणाला व कशाप्रकारे दिले जाणार हाेते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत सदर विमानातून आलेल्या प्रवाशांकडे कस्टम विभागाचे अधिकारी चाैकशी करत आहे.

मागील महिन्यात ही अशाचप्रकारे साेने तस्करीच्या दाेन घटना पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या तपासात निष्पन्न झाल्या हाेत्या. एअर इंटेलिजन्स युनिटचा अधिकारी असल्याचे सांगत एका प्रवाशाने त्याच्या बुटात 30 लाख 45 हजार रुपये किंमतीचे 650 ग्रॅम वजनाचे साेने पेस्ट स्वरुपात आ​​​​​​​णले हाेते. तर दुसऱ्या प्रवाशाने पुणे ते दुबई प्रवासासाठी जाताना 32 लाख रुपयांचे विदेशी चलन पुण्यातून घेऊन जात असताना त्यास पकडण्यात आले हाेते. याबाबत अधिक तपास पुणे सीमा शुल्क विभागाचे पथक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...