आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कोथरुडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मानसिकदृष्ट्या आजारी अल्पवयीन मुली(वय14)ने मानसिकदृष्ट्या आजारी महिले( वय33)ला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 26 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता कोथरुडमधील भुसारी कॉलनीतील बाहुविकलांग प्रतिष्ठान भवनात घडली होती. पण, आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक मानसिक आजारी मुलगी त्या महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकते. अनिता टापरे नावाच्या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
हत्येचा गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले
कोथरुड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता मोहन डोंगरे (33) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी मानसिक आजारी अल्पवयीन मुलीविरोधात खटला दाखल करुन तिला ताब्यात घेतले आहे. आरोपी मुंबईतील रहिवासी असून, मागील एका महिन्यापासून एका NGO कडून चालवल्या जाणाऱ्या दिव्यांग केंद्रात राहत होती.
पोलिसांनी दाखल केला होता आत्महत्येचा खटला
कोथरुड पोलिस उप-निरीक्षक अमोल घोडके यांनी सांगितले की, व्हिडिओत दिसले की, आरोपी मुलगी महिलेला धक्कादेऊन रँपजवळ घेऊन जाते आणि नंतर उचलून खाली फेकते. ती खाली पडल्याचा आवाज आल्यानंतर संस्थेतील काही जणांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट(आत्महत्या) दाखल केली होती, पण CCTV फुजेट समोर आल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.