आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांकडे तक्रार दाखल:अल्पवयीन मुलाचे अपहरण करून विवस्त्र छायाचित्र काढले

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकमेकांना बघण्यावरून झालेल्या जुन्या वादातून १६ वर्षांच्या एका मुलास ४ अल्पवयीन मुलांनी अपहरण करून नेत त्याची विवस्त्र छायाचित्रे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार अल्पवयीन आराेपींवर दत्तवाडी पाेलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलाच्या ४० वर्षीय वडिलांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली.

माहितीनुसार, घटनेच्या दिवशी लक्ष्मीनगर परिसरातून पीडित मुलास आराेपींनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आंबेगाव तळजाई पठारावर नेले. तेथे पाेलिस रेकाॅर्डवरील अल्पवयीन आराेपीने पीडितास ‘काल तळजाई येथे झालेल्या भांडणातील मुलांना घेऊन ये’ असे म्हणून धारदार शस्त्र त्याच्या गळ्यास लावले. त्याला विवस्त्र कतर छायाचित्र काढले.

बातम्या आणखी आहेत...