आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून सुरू असलेल्या छापा कारवायां जोरात सुरु आहे, त्यामुळे आता मटका बहाद्दरांनी नविन शक्कल लढवली आहे. जुगारासाठी चक्क भाडोत्री रीक्षाचा वापर त्यांनी सुरु केला ही बाब पोलिसांनी 28 जुलै रोजी छापा टाकल्यानंतर उघडकीस आली.
800 रुपये भाडे देऊन रिक्षाचा वापर
भाडोत्री रिक्षा दर दिवसाला 800 ते एक हजार रुपये भाड्याने घेऊन त्यातच मटक्याचा जुगार सुरू होतो. त्यामुळे आसपासचे लोकांनाही अवैध धंदे सुरु आहेत हे समजतही नाही. परंतू सदर रीक्षाचे आसपास पडलेल्या मटक्याचे चिठ्ठ्यावरुन पोलीसांनी कारवाई केली आणि त्यात रीक्षाही हस्तगत केली असल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे.
दीड लाखांचा ऐवज जप्त
स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुप्रसिध्द शब्बीर मोहम्मद शेख उर्फ शाहू याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा पथकाने छापा मारुन एक लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकुण 12 संशयित आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.
पोलिसांना अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड पेट्रोल पंपाच्या समोर, नवनाथ हॉटेल शेजारी सार्वजनिक शौचालयाचे बाजूला पिंपळाचे झाडाखाली सार्वजनिक जागेत संतोष साठे यांचे मालकीच्या पॅसेंजर रिक्षामध्ये बसून, गैर कायदेशीररीत्या पैशावर कल्याण मटका जुगार खेळत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी तुषार रवींद्र विश्वमित्र (वय 23 वर्षे, रा. पुणे), सलीम अलाउद्दीन शेख (वय 30 वर्षे, रा. पुणे),श्रीकांत सिताराम म्हेत्रे( वय 34 वर्षे, रा. पुणे), विजू नामदेव चांदणे ( वय 33 वर्षे, रा. पुणे), इरफान सलीम बांगी, (वय 23 वर्षे, पुणे), शब्बीर उर्फ साबीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख( जुगार अड्डा मालक, रा. मार्केट यार्ड, पुणे ), रिक्षा चालक संतोष साठे (रा. इंदिरानगर, पुणे ) आणि ईतर पळून गेलेल्या अनोळखी पाच व्यक्तीवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तो पोलिसांच्या रेकार्डवरील
जुगार खेळवणारा मालक शब्बीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार असून त्यावर यापुर्वीचे अनेक गुन्हे दाखल असूनही तो अद्यापही स्वारगेट हद्दीत अवैध धंदे चालवीत असल्याचे दिसून आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांचे मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि राजेश पुराणिक, मपोउनि पंढरकर, पोह मोहिते, पोह राणे, पोना माने, पोना जमदाडे, पोना पठाण, पोशि कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.