आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा बेपत्ता:नऊ वर्षांचा शाळकरी मुलगा हरवला, अपहरणाचा गुन्हा दाखल

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चतुश्रृंंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक नऊवर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णकुमार धर्मेंद्र सिंह असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील धर्मेंद्र शिवलोक सिंह (४७, रा. पीएमसी गार्डन, सोमेश्वर टेम्पल, पाषाण) यांनी याबाबत तक्रार दिली.

बेपत्ता झालेला मुलगा पाषाण येथील सोमेश्वरवाडी येथे राहण्यास आहे. सिंह कुटुंब हे मुळचे उत्तरप्रदेशातील असून त्याचे वडील पेंटिंगची कामे करून उपजीविका चालवतात. मुलगा हा सोमेश्वरवाडीतीलच एका शाळेत चौथी इयत्तेत शिकतो. 2 सप्टेंबर रोजी मुलाने वडीलांना डोके दुखत असून शाळेत जाणार नाही असे सांगितले. त्यानंतरही वडीलांनी होकार देत ते त्यांच्या कामाला निघून गेले. परंतु, मुलगा अकरानंतर त्यांना तो आढळला नाही.

बातम्या आणखी आहेत...